Raw- Indian Intelligence Agency
'Raw- भारतीय गुप्तचारसंस्थेची गूढगाथा' या रवी आमले यांच्या पुस्तकाविषयी - ही आहे रॉची कहाणी. बांगलादेश मुक्तीयुद्धाची आणि पाकिस्तानच्या फाळणीची. सिक्किमच्या सामिलीकरणाची, तशीच सियाचेन विजयाची. काश्मीर आणि पंजाबातील, मॉरिशस आणि श्रीलंकेतील दहशतवादविरोधी लढ्याची... शत्रूच्या कारवायांना पुरून उरण्याची... रॉ गुप्तचरांच्या थरारक, रोमांचक कारवायांची. पण या केवळ हेरकथाही नाहीत. तशाही गुप्तचरांच्या कारवाया निर्वात अवकाशात घडत नसतात. त्यांना पार्श्वभूमी असते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणाची. प्रत्येक राजकीय घडामोडीमागे एकाचवेळी विविध समान आणि विरोधी बले कार्यरत असतात. विभिन्न प्रतलांवरून चालत असते ते