Episode No 4 | पेशवेकालीन पुण्याची पाणीव्यवस्था आणि बिनचुक पत्ता सांगणारे "हौद"
पेशवाईने पुण्याला खऱ्या अर्थाने समृद्ध केले. पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी आखलेल्या अनेक उपाययोजनांपैकी एक म्हणजे हौदाद्वारे पाणीपुरवठा. त्या काळी कात्रज तलावातून संपूर्ण पुण्याची तहान भागवणारे हे हौद.ज्यांचा वापर आपण अनेक वर्ष पाण्यासाठी तर केलाच आहे पण एखाद्या ठिकाणाचा बिनचूक पत्ता सांगण्यासाठीही केला आहे. ती वास्तू आपल्या परिसराची ओळख बनली आहे. फडके हौद, काळा हौद, पंच हौद असे हे पुण्यातील वेगवेगळे हौद. आता मात्र काही हौद फक्त नावापुरती ओळख धरून आहेत तर आजच्या एपिसोडमध्ये या हौदांचा इतिहास आणि त्यांच्या काही आठवणी ऐकूया.