अजिंठा डोंगरातील किल्ले, लेण्या, धबधबे.
कन्नड व चाळीसगाव तालुका परिसरातील पितळखोरा लेण्यापासून तर सिल्लोड सोयगाव तालुका परिसरातील अजिंठा लेण्या पर्यंत पसरलेले या डोंगरात अनेक किल्ले अनेक लेण्या अनेक धबधबे आणि हेमाडपंथी मंदिरे आहेत.कन्नड ते चाळीसगाव सोयगाव ते सिल्लोड दक्षिणोत्तर रस्ते आहेत. कन्नड ते सिल्लोड आणि चाळीसगाव ते सोयगाव असे पूर्व पश्चिम समांतर रस्ते आहेत. या परिसराच्या पर्यटनासाठी आपण वाहनाने सर्व पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता