Ep. 08. Saangata (Lockdown chya Goshti) | सांगता (लॉकडाऊनच्या गोष्टी)
प्रेम... कुणी माणसांवर करावं, कुणी प्राण्यांवर तर कुणी आपल्या कामांवर! प्रेम कुणावरही असो, अनुभव मात्र खूप देतं; कधी हळवा आनंद देतं तर कधी बोचणारे दुःख, कधी आयुष्याच्या सागरात हेलकावे खात-खात लांबवर घेऊन जातं तर कधी क्षणार्धात बुडवून सगळं संपवून टाकतं. तरीही प्रेम म्हणजे काळ, वेळ, परिस्तिथी, वय या सगळ्यांच्या मर्यादा न जुमानता हवंहवंसं वाटणारं एक सुख; जमीनजुमला, पैसाअडका या सगळ्यापेक्षा मोठं आणि मौल्यवान! आपल्या कामांवर असंच अथांग प्रेम करणाऱ्या एका बापाची ही गोष्ट... 'सांगता'! ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख ने व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कंमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. आपल्या या Story Junction वर 'लॉकडाऊनच्या गोष्टी' या मालिकेला तुम्ही खूप प्रेम दिलंत, हा या मालिकेचा शेवटचा भाग... पण काळजी करू नका कारण आपल्या या Junction वर लवकरच नवनवीन आणि भन्नाट गोष्टींची आणखी एक ट्रेन येतीये ! काही दिवसांआधीच सुरु झालेला हा प्रवास थोडा अवघड पण खूप सुंदर होता. अगदी काही महिन्यांतच आपला परिवार १० हजारांपेक्षा जास्त सदस्यांचा झालाय आणि हा आकडा इथेच थांबणार नाही तर आणखी वाढणार आहे. अर्थात या मोठ्या कुटुंबाच्या आवडी जपणं हे आमचं कर्तव्य आहे. आमचीही जबाबदारी वाढलीये, आम्ही तुमच्या अपेक्षेप्रमाणे आणखी उत्तम काम करू, चुकांमधून शिकून काहीतरी चांगलेच देण्याचा प्रयत्न करू आणि लवकरच Story Junction - MARATHI PODCAST वर तुमच्यासाठी भरपूर नव्या गोष्टी घेऊन येऊ... तोवर तुम्हीही ऐका, तुमच्या कुटुंबियांना, परिजनांना व मित्र मैत्रिणींनाही आपले हे पॉडकास्ट ऐकावा, आणि हो तुमचे चांगले वाईट जसे असतील तसे अभिप्राय आम्हाला कळवा जेणेकरून आम्हालाही योग्य ते बदल करता येतील. For feedback or any queries please mail us at podcast@d4mad.in