युनिकॉर्न क्लब: २१ महिन्यात दरमहिना १.५ कोटी नोकरीच्या मुलाखतीचा टप्पा गाठणारी अपना.
आज ज्या कंपनीबद्दल आपण बोलणार आहोत ती कंपनी स्थापनेपासून फक्त २१ महिन्यांत युनिकॉर्न बनली आहे. त्यातले फक्त १५ महिने कंपनीचे कामकाज सुरू आहे. आजवरच्या भारतीय स्टार्टपच्या इतिहासात हा एक रेकॉर्ड आहे. या कंपनीचे नाव आहे अपना आणि त्याचे संस्थापक ( फाऊंडर) आहेत निर्मित पारीख!!