भाग १०- दीनांचा दयाळू, भक्तांचा सोयरा
भाग १०- दीनांचा दयाळू, भक्तांचा सोयरा अनुभव-- सौ शामा शरद भुसे, नाशिक शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069वाचन - पौर्णिमा देशपांडेप्रस्तुती - मी पॉडकास्टर ( नचिकेत क्षिरे)आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.*अवश्य वाचा!!श्रीगजानन अनुभव!!**भाग एक* यात एकूण बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास*भाग दोन* यात एकूण बावन्न अनुभव आहेत ( ५३ ते १०४ ) फक्त रुपये पन्नास.अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जयआपल्या महाराष्ट्राचं भाग्य महान म्हणून आपल्याला अनेक थोर संत माहात्म्यांचं वास्तव्य लाभलं.श्री संत गजानन महाराज, शेगाव, हे असेच एक महान संत. 23 फेब्रुवारी 1878 साली अचानक गजानन महाराज शेगावात प्रगट झाले. रस्त्यावर बसलेला एक निवस्त्र पुरुष पाहून, लोकं साधारण काय करतील, तशीच वागणूक लोकांनी महाराजांना दिली. पण त्यापुढे 32 वर्षे अनेक लीला दाखवून, लोकांच्या पाठीशी त्याच्या संकट समयी उभं राहून, लोकंचे ते गजानन महाराज बनले,अनेक लोकं महाराजांचे निःसीम भक्त झाले.असं म्हणतात ह्या भूतलावरून जाण्याच्या 2 वर्ष आधीच महाराजांनी आपली जाण्याची तारीख आणि जागा सूचित करून ठेवली होती, आणि असेही सांगितलं होतं की मी तिथेच असणार आहे.. झालंही तसंच.. आजही श्री गजानन महाराज आपल्या सोबत असल्याचे अनुभव त्यांचा भक्तांना येतात..बरेचदा अश्या अनुभवांबद्दल सांगितलेल्या गोष्टी ह्या केवळ कांन गोष्टी किंव्हा दंतकथा वाटू शकतात.. म्हणूनच असे अनुभव ज्यांना आले त्याच्याकडून ते ऐकून, ते शब्दांकित करून, परत त्यांना वाचून दाखवून, ज्यांना ते अनुभव आले त्यांचं नाव आणि फोन नंबर सकट अशे अनुभव छापून जास्तीत जास्त लोकांनं पर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे नागपूच्या डॉ जयंत वेलणकर ह्यांनी. त्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर महाराजांनीच त्यांच्याकडून हे काम करून घेतलं..डॉ जयंत वेलणकर हे 37 वर्ष वाणीज्यांविभागाचे प्राध्यापक होते. सेवानिवृत्ती नंतर त्यांनी आपलं आयुष्य श्री गजानन महाराज ह्यांच्या सेवेत समर्पित केलं.. ह्यांनी सगळ्या अनुभवांच संकलन करून ' श्रीगजानन अनुभव' ह्या पुस्तकाचे आत्तापर्यंत 2 भाग प्रकाशित केले आहेत.ह्याचं कामाला पूढे नेत, श्री गजानन महाराजांची प्रचिती अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून मी पॉडकस्टर घेऊन येत आहे 'श्री गजानन अनुभव हा श्राव्य पॉडकास्ट. आपण डॉ जयंत वेलणकर ह्यांनी शब्दांकित केलेले अनुभव पौर्णिमा देशपांडे ह्यांच्या आवाजात, नाचिकेत क्षीरे प्रस्तुत , डॉ जयंत वेलणकर ह्याच्या परवानगीने आणि आनंतकोटी ब्रह्मांडणायक श्री गजानन महाराज ह्यांच्या आशीर्वादाने दर गुरुवारी एक असे ऐकणार आहोत.हे पॉडकस्ट तुम्ही apple podcast, spotify, gaana, jio saavn, इतर कुठल्याही पॉडकास्ट अँप आणि you tube वर ऐकू शकता..चला तर मग लवकरचं भेटू, तो पर्यंत श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजाननडॉ जयंत वेलणकर ह्यांना - ९४२२१०८०६९ ह्या नंबर वर संपर्क करून आपल्या प्रतिक्रिया कळवू शकता.मी पॉडकास्टर ला संपर्क करण्यासाठी - ८९९९२५९७४५ ह्या नंबर वर संपर्क करू शकतापौर्णिमा देशपांडे ह्यांना pornima.d@gmail.com ह्या ई-मेल वर संपर्क करू शकता